मरगाई गल्ली, काकती येथील वयस्कर इसम पुंडलिक कल्लाप्पा कुमान्नाचे (वय 60 वर्षे) हे गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता झाले असून यासंबंधी काळातील पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
पुंडलिक कुमान्नाचे हे गेल्या 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता काकती ग्रामपंचायतीत जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडले होते. मात्र त्यानंतर पुन्हा ते घरी परतले नाहीत.
परिणामी सर्वत्र शोधाशोध करून त्यांची पत्नी सुरेखा पुंडलिक कुमान्नाचे यांनी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पुंडलिक कुमान्नाचे यांची उंची 5 फूट 2 इंच इतकी असून गहू वर्ण, अंगाने सुदृढ, लांब चेहरा असे त्यांचे वर्णन आहे. पुंडलिक याना मराठी व हिंदी भाषा अवगत आहे.
घराबाहेर पडताना त्यांच्या अंगावर पांढरे रेषारेषाचे शर्ट आणि काळी पॅन्ट असा पोशाख होता. पुंडलिक कुमान्नाचे यांच्याबद्दल कोणाला माहिती मिळाल्यास अथवा ते कोठे आढळून आल्यास संबंधितांनी काकती पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.