Wednesday, November 20, 2024

/

बेळगाव जिल्ह्यात दोन कुटुंबांसाठी प्रतिष्ठेची लढाई — जारकीहोळी व हेब्बाळकर

 belgaum

एकेकाळचे घनिष्ट मित्र आणि आताचे प्रतिस्पर्धी,कट्टर वैरी असलेल्या जारकीहोळी ब्रदर्स आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासाठी विधानपरिषद निवडणूक प्रतिष्टेची ठरत आहे. बेळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या या एमएलसी निवडणुकीत काटे की टक्कर अपेक्षित आहे. लखन जारकीहोळी यांनी मंगळवारी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

काँग्रेसने लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू चन्नाराज हट्टीहोळी यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपने विद्यमान आमदार महांतेश कवटागीमठ यांना उमेदवारी दिली आहे.दरम्यान या दोघांच्या भांडणात कवटगीमठ यांचा लाभ होणार की लखन जारकीहोळी वन टू का फोर करणार याबद्दल राजकीय आडाखे रंगत आहेत.
निम्म्याहून अधिक मतदार महिला आहेत (8,875 पैकी 4,628) आणि हे उमेदवार त्यांच्या मतांचा मोठा वाटा मिळवण्याचा प्रयत्न करतील.

एलपीजी स्टोव्ह आणि लोखंडी ट्रंक यांसारखी घरगुती उपकरणे आधीच दिली जात असल्याच्या बातम्या येत असताना, मोहिमेला वेग आल्याने रोख रक्कम आणि सोने देखील वाटपाच्या वस्तूंच्या यादीत येऊ शकते अशी चर्चा आहे.

काही वर्षांपूर्वी बेळगाव पीएलडी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीवरून जारकीहोळी आणि हेब्बाळकर यांच्यातील वैर सुरू झाले होते. जारकीहोळींच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की हेब्बाळकरांच्या भावाचा पराभव सुनिश्चित करण्यासाठी हे चारही भाऊ, त्यांचा राजकीय संबंध काहीही असोत प्रयत्न करीत आहेत.

माध्यमांशी बोलताना, लखन जारकीहोळी यांनी दावा केला की अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याने भाजप समोरील आव्हानेही वाढतील. आपण कधीही भाजपच्या तिकीटाची मागणी केली नसून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय फार पूर्वीच घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.