सकाळच्या वेळी शाळा आणि महाविद्यालयांना येणाऱ्या मच्छे परिसरातील विद्यार्थ्यांना बस ची कमतरता भासू लागली आहे .खानापूर कडून येणाऱ्या बस पूर्णपणे तुडुंब भरलेल्या असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना बससेवा उपलब्ध होत नाहीत.
काही वेळा लोबकळत प्रवास तर काही वेळा बस न थांबल्यास तसेच ताटकळत थांबण्याची वेळ त्यांच्यावर आली असून त्याविरोधात आज सकाळी विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला. तर रस्त्यावर दगड लावून खानापूरहुन येणाऱ्या सर्व बसेस अडवण्यात आल्या.
यावेळी चालक आणि वाहकांनी बस व्यवस्था अपुरी असल्यामुळे आमची गैरसोय आहे. बस तुडूंब भरलेली असताना थांबवता येत नाही. अशी कारणे त्यांनी दिली.
यावेळी विद्यार्थ्यांनी आम्हाला सकाळी सात ते साडेसात वाजता शाळा महाविद्यालय सुरू होत असून आठ पर्यंत आम्ही त्याच रस्त्यावर थांबलेल्या असतो.
ही नाराजी व्यक्त केली .दरम्यान देसुर पासून जादा बस सकाळच्या सत्रात सोडण्यात याव्यात अशी मागणी कर्नाटक परिवहन महामंडळाकडे करण्यात आली असून या मागणीचा विचार केला न गेल्यास दररोज याच प्रकारे रास्तारोको केला जाईल. असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.