Wednesday, December 25, 2024

/

सोन्याचा दागिना परत करत दाखवला प्रामाणिकपणा

 belgaum

कुद्रेमानी येथील गृहस्थाने लग्नात सापडलेला तीन तोळे सोन्याचा दागिना परत करत प्रामाणिक पणा दाखवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.तीन तोळे सोन्याचे ब्रेसलेट प्रामाणिकपणे परत दिल्याबद्दल त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.

समर्थ नगर बेळगाव येथील नागेश ज्योतिबा गावडे यांचे तीन तोळे सोन्याचे ब्रेसलेट पाटणे फाटा येथे हरवले होते. हे ब्रेसलेट प्रकाश धाकलू पाटील या कुद्रेमनी येथील नागरिकांस सापडले. त्यांनी व्ही के चव्हाण पाटील महाविद्यालय येथे आयोजित एका लग्न सोहळ्या मध्ये प्रामाणिकपणे परत केले आहे.Kudremani sincerity

मूळ तीन तोळे सोन्याचे ब्रेसलेट नागेश ज्योतिबा गावडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात आले आहे. आजकालच्या काळात प्रामाणिकपणा हरवत चालला आहे.

नागरिक जगण्यासाठी चोरीमारी आणि दरोडे यांचा पर्याय निवडत आहेत. अशा वेळी सापडलेले ब्रेसलेट परत देऊन एक वेगळा आदर्श निर्माण केल्याबद्दल प्रकाश पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.