काळा दिनाच्या फेरीला महापौर आणि उपमहापौर गेले म्हणून त्यांच्या कक्षाची मोडतोड केल्याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यातून कर्नाटक रक्षण वेदिके चे कार्यकर्ते निर्दोष झाले आहेत.2011 साली करवेच्या कार्यकर्त्यांनी मनपातील महापौर कक्षावर हल्ला केला होता त्या नंतर त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या प्रकरणी मार्केट पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. बेळगाव जिल्हा सत्र न्यायालयात यासंदर्भात सुनावणी सुरू होती. या सुनावणीत संबंधित कार्यकर्त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
तत्कालीन महापौर मंदा बाळेकुंद्री आणि उपमहापौर रेणू किल्लेकर या पदावर असताना एक नोव्हेंबर काळा दिन फेरीत सहभागी झाल्या म्हणून महानगरपालिकेत धुडगूस घालण्यात आला होता.
याप्रकरणी झालेल्या कारवाईत संबंधित कार्यकर्त्यांना अटक व सुटका करण्यात आली. त्यानंतर मार्केट पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नूतन महानगरपालिकेत घुसुन महापौर आणि उपमहापौर कक्षाची मोडतोड करण्यात आली होती. दरम्यान साक्षी पुराव्यांच्या अभावी संबंधित कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.