जगभरात भीती घातलेल्या कोरोनाचा नवीन घातक व्हेरियंट ओमीक्रॉन च्या पाश्वभूमीवर सरकार हडबडून जागे झाले आहे आणि राज्यांच्या सीमा सीलबंद करण्याचे काम चालू झाले आहे.दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला होता लोकं व्यवसाया निमित्त कार्यक्रमा निमित्त कामा निमित्त हिंडू फिरू लागली होती जग पूर्व स्थितीत हळूहळू येऊ लागलं होतं आणि अचानक कोरोनाच्या नवीन प्रकाराने उचल खाल्ल्याने भयभीत झालेलं प्रशासन गडबडीन पाऊले उचलू लागले आहे.
कोरोनाच्या मागील कालखंडात झालेल्या प्रचंड हाणीमुळे एकंदरच प्रशासनाला यावेळी कोरोनाच्या बाबतीत हयगय करण्याची मानसिकता अजिबात नाही त्यामुळे जेवढी काळजी घेता येईल तेवढी पहिला घेण्याची तयारी प्रशासन करत आहे पण या घाई गडबडीत सीमेवर ये जा करणाऱ्या प्रवाशांत आणि पोलीस अधिकाऱ्यांत खटके उडू लागले आहेत.दोन्ही बाजू कडून समजूतदार पणाची अपेक्षा आहे मात्र तसे घडताना दिसत नाही.
रविवारी कोगनोळी टोल नाक्यावर बंदोबस्ताला तपासणी नाक्यावर असलेले पोलीस अधिकारी आणि कोल्हापूर हुन बेळगावकडे येणारे एक डॉक्टर यांच्यात वाद होऊन प्रकरण हातापाई पर्यंत गेले.या घटनेचा व्हीडिओ प्रसार माध्यमे आणि सोशल मीडियात व्हायरल झाला आणि त्या घटने बाबत सगळीकडे चर्चा रंगली होती.
कोरोना रोखण्यासाठी सरकारचे प्रामाणिक प्रयत्न असले तरी नागरिकांशी अधिकाऱ्यांनी सौहार्द तेने वागणे तितकेच गरजेचे आहे आततायीपणा न करता जर नागरिकांना समजावून घेत अधिकाऱ्यांनी काम केले तर जनताही त्यांना सहकार्य करेल अन्यथा वाद विवादाचे प्रसंग नेहमी घडतंच राहतील आणि मुळ समस्येला बगल देऊन प्रशासन आणि नागरिक यांच्यातच बखेडे होत राहतील हे टाळणे गरजेचे आहे.
अंतर्गत सीमा सील करतानाच सरकारने आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर जास्त कडक नजर ठेवली तर निश्चितच आपल्या देशात कोरोनाचा प्रभावास अटकाव होण्यास मदत होईल