ज्ञानभांडार मिळवण्यासाठी ग्रंथाचे वाचन करणं आवश्यक आहे पुस्तके हीच खरी संपत्ती आहे.वाचनातून माणूस घडतो. साहित्यिक हेच भविष्य घडवणारे आहेत, वाचनातून माणसाचे मन समृद्ध होत.साहित्य चळवळीतून समाज एकत्र येतो.कवी चिंतन मनन करतो, संवेदनशील बनतो. ग्रंथ वाचनातून माणसाचे जीवन घडत जाते असे मौलिक विचार अध्यक्षपदावरून मालोजीराव अष्टेकर यांनी कावळेवाडी वाचनालय तर्फे वर्धापनदिन निमित्ताने कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी वाचनालय कावलेवाडी तिसरा वर्धापनसोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.नगरसेवक आनंद चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून, उद्घाटन करण्यात आले.म.गांधी प्रतिमा पूजन प्रा.रुपेश पाटील यांच्या हस्ते झाले.स्वागत,इशस्ववनगीत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केले.
सौ.वैशाली कणबरकर यांनी स्वागतपर भाषणात वाचनालय तील पुस्तके ग्रामीण भागातील मुलांना दिशा देणारी आहेत.मराठी भाषेतील उत्तम साहित्य वाचणे गरजेचे असल्याचे सांगितले.अध्यक्ष वाय पी नाईक यांनी प्रास्ताविक करुन कार्याचा आढावा घेतला.मुलांनी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी लिहायला हवं, सीमाभागातील मराठी भाषेचा दर्जा सुधारण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने अनुदान दिले.आभार व्यक्त केले.अशासाठी हे उपक्रम राबविले जातात, पुस्तके हीच शिदोरी आहे असे मनोगत व्यक्त केले.
पहिल्या सत्रात निमंत्रित कवी संमेलन संपन्न झाले प्रा.अशोक आलगोंडी यांच्या अभ्यासपूर्ण ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन करत काव्य मैफिलीत रंगत आणली.कवी शिवाजी शिंदे, निलेश शिंदे, मयुर नागेनटी, बाबुराव पाटील, कृष्णा पारवाडकर, सुधाकर गावडे, कृष्णा पारवाडकर, उर्मिला शहा अमृता पवार जोतिबा नागवडेकर, परशराम खेमणे, चंद्र शेखर गायकवाड,वाय पी नाईक, नामदेव मोरे, रुपेश पाटील,आर के.ठाकूरदेसाई, निलेश पारकर पुंडलिक पावशे, यांनी वाचन करून गोडी निर्माण केली.सर्वाना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले
कार्यक्रम अध्यक्ष मालोजीराव अष्टेकर, नगरसेवक आनंद चव्हाण, निलेश पारकर, प्रा.रूपेश पाटील, अनिल राणे यांना सन्मान चिन्ह,शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
गावातील मोहन मोरे, तसेच मुख्याध्यापक बी.एस.देवरमणी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांना सन्मान चिन्ह, गौरव पत्र,शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आदर्श माता पिता सौ.व श्री.यलापा बुरुड, मारूती प.मोरे, यांनाही मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थी सत्कार पृथ्वी जाधव कांचन सावंत रेखा मोरे यांना रोख रक्कम प्रत्येकी एक हजार, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. निवृत्त शिक्षकांचा सत्कार,शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला सौ.रेणू पांडुरंग गावडे यांचा सत्कार केला.
गावातील शाळेतील विद्यार्थ्यिनिंनी नृत्य सादर करुन वाहवा मिळविली .या छोट्या कलाकार ना सिद्धापा कांबळे,मलेश चौगुले यांनी पंचवीशे रुपये देऊन कौतुक केले.
यावेळी व्यासपीठावर… मालोजीराव अष्टेकर, नगरसेवक आनंद चव्हाण,वाय पी नाईक, नामदेव मोरे,पी.आर.गावडे, प्राचार्य आनंद आपटेकर, दयानंद यळूरकर, निलेश पारकर, अनिल राणे, रुपेश पाटील केदारी कणबरकर उपस्थित होते
यावेळी एन.एस.गाडेकर,आर.बी. देसाई, नामदेव खेमनाळकर, यांनी प्रत्येकी एक हजार रुपये देणगी दिली.डॉ.परशराम हुदंरे,पी.एस.भाषकळ,के.आर.भाषकर यांनीही रोख पाचशे रुपये देणगी दिली
सिंधुदुर्ग शिक्षकेत्तर कर्मचारी पदाधिकारी यांनीही पुस्तके संच भेट दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसाद जाधव, दौलत कणबरकर, सूरज कणबरकर,मोणापा यळूरकर,धाकलू ओऊळकर, यशवंतराव मोरे,एम.पी.मोरे, अभिषेक सुतार, यांनी अधिक परिश्रम घेतले
पांडुरंग नाईक यांनी एक हजार रुपये देणगी दिली
.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर मोरे यांनी, आभार शिक्षक कोमल गावडे यांनी मानले.