Wednesday, November 20, 2024

/

बेळगावात नामांकित जुवेलर्सवर आय टी रेड

 belgaum

दिवाळीच्या लक्ष्मी पुजना नंतर बेळगाव शहरातील खडे बाजार येथील पोतदार जुवेलर्स या सोन्याच्या दुकानावर आयकर खात्याने धाड टाकून चौकशी सुरू केली आहे.

पोतदार जुवेलर्स या सोन्याच्या दुकानासह जाधव नगर येथील पोतदार यांच्या निवासस्थानी देखील छापा टाकून आयकर खात्याने चौकशी केली. टिळकवाडी येथील संजीव आणि राजीव पोतदार यांच्या घरी देखील अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे.

एकूण चार घरे आणि एक दुकानांवर एकाच वेळी धाड टाकून प्राप्तीकर खात्याने संपत्ती खरेदी आणि सोने खरेदी विक्रीची कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे.

Raid
धाडी दरम्यान दुकान आणि घरा समोर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

काँग्रेस नेते डी के शिवकुमार यांचे नातलग, ठेकेदार यु बी शेट्टी यांच्या घर आणि कार्यालयावर देखील आयकर खात्याने धाड टाकली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.