गायींचे संरक्षण करण्यासाठी कसाई खाण्यात पाठवण्या पासून त्यांना वाचवण्यासाठी ए आणि बी ग्रेडच्या मंदिरातून गोशाळा सुरू करण्यबाबत राज्य सरकार विचार करत आहे.दिवाळी बाल प्रतिपदा निमित्त राज्यातील 35 हजार हुन अधिक मंदिरात गो पूजन करण्यात आले आहे अशी माहिती धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोलले यांनी दिली.
बेळगाव येथील दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात गोवर्धन (गोमाता)पूजन केल्यावर त्या बोलत होत्या.यावेळी मंत्री जोलले यांनी सपत्नीक तांदूळ केळी खोबरे सह अन्न खाद्य भरवत गो पूजन करत या कार्यक्रमाला चालना दिली.
भारत हा कृषीप्रधान देश आहे आईच्या दुधा एव्हढेच महत्व गाईच्या दुधाला आहे कारण आईचे दूध मिळालं नाही तरी माणूस गाईचे दूध पिऊन जगू शकतो पुढील पिढीला गोमतेचे महत्व कळण्यासाठी गोमतेच रक्षण जरुरी असल्याचे त्यांनी नमूद केलं.
सुरुवातीला 250 हुन अधिक मंदिरात गो शाळा सुरू केली जाणार असून जिल्हा निहाय ए आणि बी ग्रेड दर्जाच्या मन्दिरांची यादी जाहीर करूनच मंदिरातून गो शाळा सुरू करण्याची योजना हाती घेतली जाईल असेही त्या म्हणाल्या.
मंदिर पुजाऱ्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य विमा पुरवण्या बाबत राज्य सरकार विचाराधीन असल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे.