निसर्गाचा चमत्कार.. चक्क चार पायाचे कोंबडीचे पिल्लू!-कोंबडीचे चार पायाचे पिल्लू आपण कुठे पाहिलेत का? निसर्गाचा हा चमत्कार बेळगाव तालुक्यातील बाकनूर गावात पहावयास मिळत आहे.
चार पायाचे हे कोंबडीचे पिल्लू सध्या कुतूहलाचा विषय झाले असून पिल्लू पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
बाकनूर (ता. बेळगाव) येथील शेतकरी मनोहर धोंडिबा सावंत यांचा शेती व्यवसाय असून शेतीबरोबरच ते घरी गावठी कोंबड्याही पाळल्या जातात.
दोन दिवसांपूर्वी यामधील एका कोंबडीला 9 पिल्ले झाली. त्यामधील एक पिल्लाला चक्क चार पाय असल्याने हा कुतुहलाचा विषय झाला आहे. डॉक्टरांच्या मते नॅचरल स्ट्रक्चर डिफाॅर्मिटीमुळे (नैसर्गिक रचना विकृती) असा प्रकार घडू शकतो.
मनोहर सावंत यांच्या घरातील ‘चार पायांचे कोंबडीचे पिल्लू’ हा निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी सध्या गावकऱ्यांची गर्दी होत आहे.