कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे. देशातील काँग्रेसशासित राज्यांनी पेट्रोलियम आणि डिझेलच्या किमती कमी करण्यास नकार दिला असताना कर्नाटकात विरोधी नेत्यांना इंधनाच्या दरांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. असे ते म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना बोम्मई म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारचे कौतुक करण्याऐवजी काँग्रेस नेते कर्नाटक सरकारवर टीका करत आहेत. राज्य सरकारने इंधनाच्या दरात प्रतिलिटर ७ रुपयांची कपात केली आहे.
हनगलमधील पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर सरकारने किमती कमी केल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे.
“सरकारने पोटनिवडणुकीपूर्वी भाव कमी केले असते, तर त्याच नेत्यांनी सरकारवर अधिक मते मिळविण्यासाठी असे केल्याचा आरोप केला असता.
इंधन दरवाढीबाबत काँग्रेस नेत्यांचा दुटप्पीपणा हे त्यांच्या जनविरोधी मानसिकतेचे स्पष्ट द्योतक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्याबाबत विचारले असता मुख्यमंत्र्यांनी या मुद्द्यावर केंद्र सरकार निर्णय घेईल असे सांगितले.