वाहन चोरट्यांना अटक-बेळगाव ग्रामीण पोलिसांनी आज टिपू नगर क्रॉसजवळ पाच जणांना एक वाहन आणि चोरीच्या वाहनासह अटक करण्यात आली आहे.पोलीस आयुक्तांनी या टीमचे कौतुक केले आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुनीलकुमार नंदेश्वरा पीआय ग्रामीण स्टेशन, आनंदा अग्रवाल, पीएसआय व कर्मचारी एएसआय बी ए चौगला , कोटाईबागी, वाई. ठालेवाडा, पी.एस.पवार, एस.एम.सिंदगी आदींनी ही कारवाई केली.
प्रकरण दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
बेळगाव शहर आणि परिसरात वाहन चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याप्रकरणी पाळत ठेऊन ही कारवाई करण्यात आली आहे.