भारत संचार निगम लिमिटेड ही सरकारची बीएसएनएल सेवाभावी संस्था असून यांच्या कार्यालय आवारात असलेला सर्वात मोठा टॉवर हलविण्यात येणार आहे.
हा टॉवर 1992-93 च्या दरम्यान मुख्य बीएसएनएल कार्यालयाच्या आवारात 100 मीटर चा बसविण्यात आला होता. काही कालानुसार ठराविक वर्षानंतर हा टॉवर हलविणे आवश्यक होते.
मात्र याच्यापासून कोणत्याही मोबाइल संच किंवा सेवेला अडथळा होणार नाही असे भारत निगमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले त्याच्या शेजारी असलेल्या साठ फुटाच्या टॉवर वरून या सर्व सुविधा दिल्या जातील असे सांगण्यात आले.
यापूर्वी शहरांमध्ये इतर काही कंपन्यांचे मोबाईल सेवेसाठी टॉवरची आवश्यकता भासत होती. यामुळे याचा उपयोग केला जात होता. इतक्या उंचीच्या टॉवर ची गरज भासत होती.
मात्र इतर सगळ्या कंपन्यांचे संपूर्ण भागात स्वतंत्र त्यांचे सेवा असल्याने इतक्या उंचीच्या टॉवरची गरज भासू शकत नाही. असे बीएसएनएलच्या अभियंत्यांनी सांगितले