आमचं ध्येय पहिला भाजपला जिंकवणे दुसरं काँग्रेसला पाडवणे हेच आहे पहिल्या बैठकीपासून याच भूमिकेतून आम्ही पूढे जात आहोत आगामी सोमवारी पासून फुल फ्लेज कामाला लागणार आहोत असे मत अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी केलं आहे.
माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.आम्ही डी सी बँक संचालक, सहकार क्षेत्रात जिल्ह्यात काम करणाऱ्यांची बैठक आम्ही बोलवली होती त्यात विधान परिषद बाबत मतदान करायला सांगितलं आहे.भाजपला कसं अनुकूल होईल तसं सहकार क्षेत्रात सर्वांना सांगण्यासाठी आम्ही बैठका करत आहोत असे ते म्हणाले.
पहिला प्रयत्न आम्ही भाजपला जिंकवण्यासाठी करत आहोत.लखन आणि रमेश जारकीहोळी यांनी लखन साठी दुसरा उमेदवार म्हणून पक्षाकडून कधीच तिकीट मागितलं नाही मी आणि इराणणा कडाडी,मंगला अंगडी आणि संजय पाटील यांनी लखन यांना भाजपचा दुसरा अधिकृत उमेदवार करा अशी मागणी केली होती मात्र पक्षाने एकच अधिकृत उमेदवार दिलाय त्यानंतर लखन यांनी अपक्ष बसण्याचा निर्णय घेतलाय आम्ही पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या मागे आहोत असेही त्यांनी नमूद केलं
बेळगावातील राज्यातील मतदार सुज्ञ आहेत कुणाला मतदान करायचे त्यांना कल्पना आहे जर लखन अपक्ष म्हणून निवडणुकीला थांबले नसले तर ग्राम पंचायतींना उमेदवारांनी भेटी पण दिल्या नसत्या असेही ते म्हणाले.
रमेश जारकीहोळी तर राबतचं आहेत या शिवाय 30 पासून उमेश कत्ती फिरणार आहेत प्रभारी अरुण कुमार देखील येणार आहेत लक्ष्मण सवदी सह सगळे या प्रचारात उतरतील असेही त्यांनी स्पष्ट केलं.