कर्नाटक सरकारच्या बेळगाव हलगा येथील सुवर्ण सौध मध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली आहे. या अगोदर फक्त बेळगावात अधिवेशन घ्यायचे निश्चित झाले होते मात्र तारीख ठरली नव्हती.
13 डिसेंबर पासून दहा दिवसाचे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.2018 पासून बेळगाव मध्ये हिवाळी अधिवेशन झाले नव्हते यावर्षी 13 ते 23 डिसेंम्बर दरम्यान हे अधिवेशन होणार आहे.यावेळी अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
10 डिसेंम्बर ते 24 डिसेंम्बर पर्यंत आमदार मंत्री आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना रहाण्यासाठी हॉटेल आरक्षित करण्यात आली आहेत. यासाठी 10 ते 24 दरम्यान बेळगावात येणाऱ्या प्रवाशांना हॉटेल रूम गरज असल्यास त्यांनी अगोदर तपासून यावे लागणार आहे कारण जवळपास बहुतांश लॉज जिल्हा प्रशासनाने अधिवेशना साठी आमदार कर्मचाऱ्यांना करीता आरक्षित केली आहेत. आमदार पोलीस अधिकारी सचिव आणि मार्शल यांची सोय करण्यात आली आहे तर काही अधिकाऱ्यांची सोय हुबळीत देखील करण्यात आली आहे.
अधिवेशनाची सगळी तयारी झाली असून या अधिवेशनात उत्तर कर्नाटकावर विशेष चर्चा होणार असून याची तारीख अजून ठरली नाही.13 डिसेंबर रोजी होणाऱ्या अधिवेशना विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेणार आहे त्यामुळे हा मेळावा देखील अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी होणार आहे