बेळगाव येथील एस के ई संस्थेच्या राणी पार्वती देवी कॉलेजच्या हिंदी विभागातर्फे शनिवार दि.२७ नोव्हेंबर रोजी ‘हिंदी के क्षेत्र में रोजगार के अवसर’ या विषयावर एक दिवसाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. विषयतज्ञ म्हणून कोकण रेल्वे, मडगांव गोवा अनुवादक अधिकारी सतीश धुरी हे उपस्थित राहणार असून उद्घाटक म्हणून निवृत्त राजभाषा अधिकारी, बेळगावचे किशोर काकडे हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे संयोजक हिंदी विभागाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पोवार आहेत. हिंदी विषयाचे प्राध्यापक व ऐच्छिक हिंदी विषयाच्या विद्यार्थ्यांनी या चर्चासत्रासाठी नावे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
संस्थेच्या सेवंतीलाल शहा सभागृहात या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ९.३० वाजता चर्चासत्राला प्रारंभ होणार आहे. नावे नोंदविण्यासाठी प्रा. विजयकुमार पाटील भ्रमणध्वनी ९३४२६७२७८४ व डॉ. अजित कोळी भ्रमणध्वनी ८९७१२६१३०१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कॉलेजतर्फे करण्यात आले आहे.