Wednesday, November 27, 2024

/

स्वच्छता सर्वेक्षण : बेळगावची 172 व्या क्रमांकावर झेप!

 belgaum

स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयातर्फे विज्ञान भवन नवी दिल्ली येथे आज शनिवारी आयोजित स्वच्छ अमृत महोत्सवांमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतातील सर्वात स्वच्छ शहरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

स्वच्छ भारत अभियानाच्या विविध उपक्रमांमध्ये स्वच्छते बाबतीत सर्वोत्तम कामगिरी बजावलेली गावं, शहरं, राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश अशा सुमारे 300 हून अधिक विविध विभागातील पुरस्कार विजेत्यांना आजच्या सोहळ्यात गौरविण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षण -2021 मध्ये बेळगाव शहराने 172 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

आपल्या विभागातील देशातील 372 शहरांमध्ये बेळगाव 172 व्या क्रमांकावर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत उत्तम कामगिरी बजावताना बेळगाव 97 स्थाने पुढे सरकले आहे. गेल्यावर्षी 2020 साली 269 क्रमांकावर असणारे बेळगाव तत्पूर्वी 2019मध्ये 277 व्या क्रमांकावर होते.

एकंदर स्वच्छतेच्या बाबतीत बेळगावने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाची मात्र घसरण झाली असून यंदा त्यांना 48 वा क्रमांक मिळाला आहे. मागील वर्षी 2020 मध्ये 38 व्या स्थानावर असणारे बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड तत्पूर्वी 2019 मध्ये 44 व्या आणि 2018 मध्ये 51 व्या स्थानावर होते. थोडक्यात यावर्षी कॅन्टोन्मेंट बोर्ड 10 स्थानं खाली घसरले आहे.Swachh survekshan 2021

दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत 1 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या विभागात यंदा सलग 5 व्या वर्षी इंदोर शहराने देशातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब पटकावला आहे. त्या खालोखाल सुरत आणि विजयवाडा शहरांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला आहे. त्याचप्रमाणे 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या विभागात विठा, लोणावळा व सासवड या महाराष्ट्रातील शहरांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक हस्तगत केला आहे.

वाराणसीने ‘उत्कृष्ट गंगा शहरे पुरस्करा मिळविला आहे. अहमदाबाद कन्टोनमेंट बोर्ड स्वच्छतेच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांकावर असून त्यामागोमाग मेरठ आणि दिल्ली कॅंटोनमेंट बोर्डाचा क्रमांक लागतो.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.