बेळगाव जिल्ह्यातील दोन विधान परिषद जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर एकूण दहा जणांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले होते .त्यापैकी नऊ जणांचे अर्ज वैध ठरविण्यात आले असून एकाचा अर्ज अवैध ठरला आहे.
त्यामुळे सध्या तरी नऊ जण रिंगणात आहेत .माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. विधान परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. भाजप काँग्रेस बरोबर आता अपक्ष म्हणून लखन जारकीहोळी यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या तिघांमध्ये मोठी लढत होणार आहे.
मंगळवारी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.काल 24 नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी झाल्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे .म्हणजेच उद्या शुक्रवार दिनांक 26 रोजी कोण अर्ज माघारी घेतो यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यात एकूण आठ हजार 875 उमेदवार आहेत. प्रत्येकी उमेदवार गाठीभेटी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. बेळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत मध्ये भाजप बरोबरच काँग्रेसनेही सत्ता प्रस्थापित केली आहे. बेळगाव तालुक्यामध्ये म ए समितीची अनेक ग्रामपंचायतीवर सत्ता आहे आणि समितीचे ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे मराठी भाषिकांच्या मतांवर विधान परिषद सदस्यांचे भविष्य अवलंबून असल्याचे चित्र आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी लखन जारकीहोळी हे अपक्ष उमेदवार आहेत त्यांच्या मुळे अधिकृत उमेदवार महंतेश कवटगीमठ याना कोणता त्रास होणार नसल्याचं म्हटलंय या शिवाय रमेश जारकीहोळी हे पाहिलं मत महंतेश कवाटगीमठ यांना टाकण्यासाठी काम करत आहेत त्यांनी तसं मला सांगितलं आहे असेही बोम्मई यांनी स्पष्ट केले.एकूणच कितीही जण रिंगणात असले तरी लढत ही मुख्यतः त्रिशंकू होईल असा राजकीय अभ्यासकांचा अंदाज आहे.