Sunday, January 5, 2025

/

बेळगावमध्ये १३ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता

 belgaum

कर्नाटक विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनाची तयारी पाहण्यासाठी कर्नाटक विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी यांनी आज हलगा येथील सुवर्ण विधान सौधला भेट दिली. धोरणामुळे खंडित राहिलेले कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन बेळगावात बनवण्याचा अट्टाहास यावेळी कर्नाटक सरकार पूर्ण करणार आहे.

माध्यमांशी बोलताना होरट्टी यांनी, अधिवेशन 13 डिसेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. बऱ्याच वर्षानंतर कर्नाटकाचा मुख्यमंत्री उत्तर कर्नाटकातून जाण्याची ही वेळ आली आहे.
या पार्श्वभूमीवर बेळगावात यावेळी कोणत्याही पद्धतीत अधिवेशन घेणार असा अट्टाहास सरकारने सुरू केला असून त्याची पूर्व तयारी सध्या सुरू झाली आहे.

2018 पासून बेळगाव येथे हिवाळी अधिवेशन झाले नाही.कोरोनामुळे ते घेता आले नाही. यावेळीही अधिवेशन होत असले तरी यावेळी थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी पूर्वतयारी बैठक घेण्यात आली.

अधिवेशन सुरळीत करण्यासाठी सर्व प्रकारची पावले उचलण्यात आली आहेत. अधिवेशन डिसेंबरमध्ये होणार हे नक्की झाले असून त्याची तारीख सरकार ठरवणार आहे.
आमदार निवासाची उभारणी ही मागणी आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली जाईल.Horatti visits soudha

आमदारांच्या घराच्या बांधकामाचे साधक-बाधक चर्चा करून शासन योग्य ती कार्यवाही करेल.असेही त्यांनी सांगितले.
बेळगाव कर्नाटकातच हे ठासून सांगण्यासाठी बेळगावला दुसरा राजधानीचा दर्जा कर्नाटक सरकारने दिला. तेव्हापासूनच बेळगावात कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशन घेण्याचा घाट बांधण्यात येतो .2006 साली सर्वप्रथम कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन बेळगावात घेण्यात आले.

त्यावेळी खाजगी जागेत अधिवेशन भरविण्यात येत होते. त्यानंतर कोट्यवधी रुपये खर्चून सुवर्ण विधानसौध इमारत बांधण्यात आली व तेथे अधिवेशन घेतले जात आहे. कोरोनामुळे त् त्यात खंड पडला होता. मात्र विविध कन्नड संघटनांनी या वर्षी बेळगाव अधिवेशन घ्यावे अशी मागणी लावून धरल्यामुळे कर्नाटक सरकारने आता त्याची तयारी सुरू केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.