पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर न्यायालयाने ठरवून दिलेली पोटगीची रक्कम न दिल्याच्या कारणावरून एका पतीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.राहुल मुरकुंबी (मूळ गुंजी, सध्या गोवा) असे त्याचे नाव आहे.
खानापूर तालुक्यातील या व्यक्तीच्या या अटकेमुळे पोटगी नाकारणाऱ्या व्यक्तींनाही कारवाईला सामोरे जावे लागू शकते. याचे एक उदाहरण समोर आले आहे .
खानापूर येथील आदर्श कॉलनीत राहणाऱ्या संबंधित व्यक्तीच्या पत्नीने आपल्या पतीने पोटगीची रक्कम दिली नसल्याची माहिती न्यायालयात याचिकेच्या माध्यमातून दाखल केली होती. खानापूर येथील प्रथम वर्ग फौजदारी न्यायालयात याचिका दाखल झाली.
त्यासंदर्भात नोटीस देऊनही पती गैरहजर राहत होते. पोटगीची रक्कम भरली नव्हती. सध्या गोवा येथे वास्तव्यास असलेल्या या पतीला अटक करून न्यायालयात दाखल करावे अशी सूचना न्यायालयाने दिली. यावरूनच या आदेशाची अंमलबजावणी खानापूर पोलिसांनी 21 नोव्हेंबर रोजी केली आणि त्याला न्यायालयात हजर केले.
कत्यावेळी न्यायाधीशांनी पोटगी रक्कम भरण्याचा आदेश दिला. मात्र पोटगी रक्कम भरण्यास नकार दिल्याने न्यायालयाने चार डिसेंबर पर्यंत त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात केली आहे.
याचिकाकर्त्या पत्नी च्या वतीने खानापुरातील वकील चेतन मणेरीकर व त्यांचे सहकारी विजय हिरेमठ यांनी काम पाहिले.