एसीबीचे बेळगावसह राज्यभरात छापे-लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबी अधिकाऱ्यांनी राज्यातील 60 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले असून बेळगाव जिल्ह्यातही अनेक ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.
लाचलुचपत विभागाच्या या व्यापक कारवाईमध्ये 8 पोलिस अधीक्षक आणि 100 अधिकाऱ्यांसह एकूण 300 कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
सौंदत्तीचे सहकार विकास अधिकारी ए. के. मस्ती, गोकाकचे वरिष्ठ मोटार निरीक्षक सदाशिव मर्लींगनावर आणि हेस्कॉम बेळगावचे नाथाजी हरजी पाटील यांच्या घरावर एसीबीने छापा टाकला आहे.