बुधवारी बेळगाव जिल्ह्यासह राज्यात ए सी बी धाडी टाकत भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून कोट्यावधी रुपयांची संपत्ती जप्त केली.बेळगाव जिल्ह्यात तीन ठिकाणी लाचलुचपत खात्याने धाडी टाकल्या होत्या. कमाई पेक्षा 200 पट अधिक मालमत्ता या सरकारी बाबूंकडे सापडली आहे.
आर टी ओ इंस्पेक्टर सदाशिव मरलिंगनावर यांच्या कार्यालय, गोकाक मधील घर, रामदुर्ग तालुक्यातील कल्लूर मधील घर, बेळगाव शहरातील रामतीर्थ नगर मधील घर तसेच मुधोळ येथील भावाच्या घरात एकाच वेळी धाड टाकण्यात आली होती.
कल्लूर गावांत 22 एकर जमीन,बेळगावात एक घर,31 लाख किंमतीच्या दोन कार, पाच लाख किंमतीचे एक किलो 135 ग्रॅम सोन्याचे दागिने,पाच लाख किंमतीच्या गृहपयोगी वस्तू, घरात 8 लाख रुपये रोकड, आर टी ओ जवळ 1 कोटी 87 लाख किंमतीची बेकायदेशीर संपत्ती जप्त करण्यात आली आहे.कमाई पेक्षा 190 टक्के अधिक संपत्ती या आर टी ओ अधिकाऱ्याकडे जप्त करण्यात आली आहे अजूनही ए सी बी अधिकारी तपास करत आहेत.
सहकार विकास अधिकारी आडवीसिद्धेश्वर मस्ती यांच्या बैलहोंगल येथील घरावर धाड टाकत 66 लाख किंमतीची बैलहोंगल मधील दोन घरे, बनवण्यात येणारे 20 लाख किंमतीचे घर,
44 लाख किंमतीचे चार ठेवी
20 लाख किंमतीची कार आणि दुचाकी
11 लाख किंमतीचे 263 ग्रॅम सोन्याचे दागिने
बँक डिपॉजिट, ठेवी शेअर्स इन्शुरन्स जप्त करत पाच लाख किंमतीचे गृहपयोगी वस्तू जप्त केल्या आहेत.घरात 1 लाख 20 हजार रोकड,एकूण 1 कोटी 24 लाखांची संपत्ती जप्त, कमाई पेक्षा 191 टक्के अधिक संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
नाथाजी पाटील हेस्कॉम अधिकारी बेळगाव यांच्या घरावर देखील धाड टाकत एक घर दोन ठेवी आणि बनवत असलेली दोन घरे सापडली आहेत.
10 लाख किंमतीचे 263 ग्रॅम सोन्याचे दागिने
20 लाख किंमतीच्या गृहपयोगी वस्तू
एकूण 1 कोटी 82 लाखांची संपत्ती जप्त,कमाई पेक्षा 240 टक्के अधिक संपत्ती जप्त करण्यात आली असून ए सी बी अधिक तपास करत आहे.