कर्नाटक राज्यातील कोविड प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाल्यामुळे लवकरच तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर दोन दिवसात कोविड -19 संबंधित निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय घेऊ.असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले आहे.
ते म्हणाले की, लवकरच पहिली ते पाचवीचे वर्गही पुन्हा सुरू करण्याबाबत सरकार निर्णय घेईल.
प्रकरणे कमी झाली असली, तरी विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यभरात आणि सीमावर्ती भागात घ्यावयाच्या खबरदारीच्या उपायांवर चर्चा करण्याची गरज आहे .आम्ही लवकरच एक विस्तृत बैठक घेऊन यावर विचार करणार आहोत असेही त्यांनी सांगितले.
पोटनिवडणुकी संदर्भात बोलताना ते म्हणाले की, माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा हंगल आणि सिंदगी विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन दिवस प्रचार करतील
आणि निवडणुकीच्या काही दिवस आधी ते रोड शोमध्ये भाग घेतील जेणेकरून पोटनिवडणुकीत त्यांच्या सहभागाबाबत कोणताही गोंधळ होऊ नये. असा टोला त्यांनी मारला
भाजप दोन्ही जागा जिंकेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.