कर्नाटक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तरी सदर मतदार यादीत नांवे समाविष्ट करण्यासाठी येत्या 6 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन वायव्य कर्नाटक पदवीधर आणि प्रादेशिक आयुक्त कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
वायव्य कर्नाटक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी 1960च्या निवडणूक नोंदणी नियम 31(4) नुसार गेल्या 1 ऑक्टोबर 2021 रोजी विधान परिषद निवडणूक मतदार यादीतील नांव नोंदणीसंदर्भात जाहीर नोटीस दिली आहे.
डेक्कन हेरॉल्ड आणि प्रजावानी या वृत्तपत्रांमध्ये 2 ऑक्टोबर रोजी ती प्रसिद्धही झाली आहे. तरी ज्यांची नांवे मतदार यादीत नाहीत त्यांनी ती मतदार यादीत समाविष्ट करावीत अथवा
नव्याने नांवे समाविष्ट करण्यासाठी फॉर्म -18 उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर फॉर्म भरून संबंधितांनी तो निवडणूक नोंदणी अधिकारी /सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी अथवा नियुक्त अधिकारी कार्यालयाकडे 6 नोव्हेंबर 2021पर्यंत अथवा तत्पूर्वी धाडावा किंवा जमा करावा, असे आवाहन
वायव्य पदवीधर आणि प्रादेशिक आयुक्तालयाच्या निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांकडे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.