12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाला हिरवा कंदील दिल्यानंतर कर्नाटक प्रथम 16 आणि 17 वर्षांच्या मुलांना लसीकरण करणार आहे.
राज्याच्या कोविड -19 तांत्रिक सल्लागार समितीच्या -टीएसी सदस्याने सांगितले, की त्यांनी उच्च वयाच्या मुलांना प्रथम लस देण्याची शिफारस केली आहे, त्यानंतर 16 वर्षांखालील मुलांना लस दिली जाईल. समितीने 16-17 वयोगटातील आजारी मुलांना लवकरात लवकर ओळखण्याची शिफारस केली आहे
झायडस कॅडिलाचे झायकोव्ही-डी आणि भारत बायोचचे कोवाक्सिन या दोन लसींचा भारतातील लसीकरण कार्यक्रमात लवकरच समावेश होण्याची शक्यता आहे.
झायकोव्ही-डी ला ऑगस्टमध्ये ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया कडून इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन मिळाले असताना, विशेषज्ञ समितीने कोवाक्सिनची शिफारस जवळजवळ एक आठवड्यापूर्वी केली होती.यामुळे लवकरच बालकांना लस मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकणार आहे.