मित्रासोबत फोटोग्राफी करायला गेले असता पोहतेवेळी दोघे युवक क्वारीत बुडल्याची घटना बेळगाव जवळील यरमाळ येथे घडली आहे.रविवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान ही घटना घडली असून बेळगाव शहरातील बुडालेल्या युवकांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.
गणेश कांबळे वय 17 रा हिंदवाडी व तेजस यलकपाटी वय 19 पी के क्वाटर्स बेळगाव अशी क्वारीत साचलेल्या पाण्यात बुडालेल्या युवकांची नावे आहेत.
घटनास्थळी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली असून अग्निशामक दल पोलीस आणि एस डी आर एफच्या जवानांकडून सायंकाळी पर्यंत मृतदेह शोध मोहिम सुरू होती.
ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येळ्ळूर जवळील यरमाळ जवळ क्वारीत तलाव सदृश पाणी साचले आहे या ठिकाणी रविवारी असल्याने व्हीडिओ फोटोग्राफी करण्यासाठी बुडालेले युवक गेले होते त्यावेळी पोहण्यासाठी ते पाण्यात उतरले होते दोघा पैकी फक्त एकट्याला पोहायला येत होते एकटा बुडाला त्यावेळी एकट्याचा हात धरून दोघे बुडाले अशी माहिती मिळाली आहे.
घटनेची बेळगाव ग्रामीण पोलिसांत नोंद झाली आहे यावर्षी मुबलक पाऊस झाल्याने तालुक्यातील बहुतांश विहिरी तलाव व क्वारी तुडुंब भरल्या आहेत त्यामुळे पर्यटन म्हणून फिरायला जाणाऱ्यानी पोहते वेळी सावधानी बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे.