पावसामुळे पत्र्याचे राहते शेड कोसळून विद्युत तारेचा शॉक लागल्याने दोन रेल्वे कर्मचार्यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी देसुर येथे घडली.
वेंकटेश भिमाप्पा वड्डर (वय 35) रा. बबलेश्वर जिल्हा विजापूर तर बसवराज वड्डर ( वय 38) रा. कलगी जिल्हा बिजापूर असे घटनेत मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की हे दोघे कर्मचारी रेल्वे ट्रॅकचे काम करत होते. दुपारी झालेल्या भरमसाठ पावसामुळे आपल्या शेडमध्ये बसलेले असते वेळी पावसाच्या जोराने त्यांचे पत्र्याचे शेड कोसळली गेले यातच विद्युत दाहिनी तुटल्याने या पत्र्यावर पडल्याने त्याचा धक्का बसून दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती पोलिसांना कळताच घटनास्थळी ग्रामीणचे पोलीस दाखल होऊन पाहणी केली व घटनेचा पंचनामा केला.
या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना कळवली. ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील कुमार यांच्या नेतृत्वाखाली यांचे सहकारी अधिक तपास करीत आहेत.