Tuesday, January 28, 2025

/

प्रशासनाच्या ‘या’ भूमिकेने नागरिक अचंबित!

 belgaum

गणपत गल्ली येथील संतोष निर्मल चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या कोटिगोब्बा 3 हा कन्नड चित्रपट पाहण्यासाठी कन्नडिगांकडून एकच गर्दी करून खुलेआम कोरोना नियमावली पायदळी तुडवली जात असताना श्री दुर्गामाता दौडवर निर्बंध करणाऱ्या पोलिस व जिल्हा प्रशासनाने मात्र याकडे सोईस्कर कानाडोळा केल्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.

बेळगाव शहरातील दुर्गा माता दौड वर निर्बंध घालून 15 जणांना परवानगी देणाऱ्या पोलीस प्रशासनाला संबंधित चित्रपटाला होणारी गर्दी दिसत नाही का? असा सवाल केला जात आहे. चित्रपटासाठी होणारी खच्चून गर्दी, रेटारेटी, परिणामी कोरोना नियमांचे उल्लंघन चालेल, संसर्ग वाढला तर वाढू दे, मात्र दुर्गामाता दौडीची शिस्तबद्धता चालणार नाही, ही प्रशासनाची भूमिका सर्वांसाठी अचंबित करणारी आहे.

कोटिगोब्बा 3 चित्रपट आणि दुर्गामाता दौडच्या बाबतीतील प्रकार राज्योत्सव आणि काळा दिनाच्या बाबतीतही पहावयास मिळत आहे. राज्योत्सवाची पूर्वतयारी जोमाने करण्यात येत आहे. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी राज्योत्सव कोरोना नियमांचे पालन करुन साजरा करण्यास परवानगी दिली आहे.

 belgaum

तथापि यंदा कोणत्याही संघटनेला काळा दिन साजरा करण्यास किंवा निषेध फेरी काढण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार घटनेने सर्वांना दिला आहे.

हे सत्य नाकारून काळ्या दिनावर बंदी घालून ‘आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट’ अशी भूमिका जिल्हा प्रशासन घेत आहे की काय? अशी शंका व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.