बेळगावच्या नागरिकांना 24 तास शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा याकरता बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या प्रयत्नातून 24 तास पाणीपुरवठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
आज दि. 27 ऑक्टोबर रोजी बसवणकोळ येथे या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. खासदार मंगला अंगडी, माजी महापौर आमदार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला.
यावेळी बोलताना आमदार अनिल बेनके यांनी बेळगाव शहरात चोवीस तास पाणी मिळावे अशी अनेक वर्षापासून नागरिकांची मागणी आहे. अशाप्रकारे जागतिक संस्थेच्या सहकार्याने 104 कोटी रुपये खर्चून संपूर्ण शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी सवलत उभारण्यात आली आहे .
शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी बसवणकोळ येथे शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. तेथे या आधी एक प्लांट उभारण्यात आला होता, मात्र त्या कामात व्यत्यय येत असल्याने त्याच्या शेजारी 31 कोटी रुपये खर्चून नवा प्लांट उभारण्यात येणार आहे .
त्यामुळे 31 एम एल डी चा नवा प्लांट सध्या युद्धपातळीवर हाती घेण्यात आला असून बेळगावच्या नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा 24 तास व्हावा याकरिता हा प्रकल्प होणार आहे.
पुढील काळात शहराच्या प्रत्येक भागात गल्लीत तसेच अनेक ठिकाणी 24 तास पाणीपुरवठ्याचे पाईपलाईन घालण्यात येणार आहे. त्यामुळे आधी हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस आहे.
यावेळी आमदार अनिल बेनके यांच्यासह माजी महापौर बसवराज चिकलदिनी, एल अँड टी कंपनीचे अभियंते मुरुगेंद्रगौडा पाटील, राठोड, राजशेखर डोनी आदी उपस्थित होते.