Friday, December 20, 2024

/

पालकांनी शाळेला जा म्हटले म्हणून 13 वर्षीयाची आत्महत्या

 belgaum

13 वर्षांच्या मुलाने पालकांनी शाळेत जाण्यास सांगितल्यानंतर गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे.
बेळगावच्या कसाई गल्लीतील 13 वर्षीय शहीद खलेखान शेख याने हा प्रकार केला आहे. खालेखानला तीन मुले आहेत. मृत मुलगा पहिला मुलगा आहे.

तो एका खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सहावीत शिकत होता. वडिलांनी आपल्या मुलाला शाळेत जाण्याचा सल्ला दिला , सर्वत्र शाळा सुरू केली जात आहे.त्यामुळे त्यानेही शाळेला जावे असे त्यांचे म्हणणे होते.

घरी वडील आणि आई सोबत वाद घालून शहीदने हा पर्याय निवडला आणि त्याचा मृत्यू झाला आहे.

मार्केट सीपीआय मल्लिकार्जुन तुलसीगेरी, पीएसआय विठ्ठल हवनूर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मुलाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मार्केट स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाचे वडील आणि आई दुखाग्नीत बुडाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.