Saturday, January 11, 2025

/

युवकाचा फासावर लटकलेला मृतदेह खुनाचा संशय

 belgaum

बेनकनहळ्ळी येथील एका युवकाचा फासावर लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह क्रांतीनगर, गणेशपुर येथे आज शनिवारी सकाळी आढळून आला आहे. मृताच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्यामुळे हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

संजय भरमा पाटील (वय 30, रा. बेनकनहळ्ळी) असे मयत युवकाचे नांव आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाल्यानंतरच सदर युवकाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला? हे स्पष्ट होणार आहे. कुली काम करणार्‍या संजयचा मृतदेह आज सकाळी क्रांतीनगर येथील एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच एकच खळबळ उडाली आणि घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.

या बाबतची माहिती प्रथम कॅम्प पोलिस ठाण्याला देण्यात आली. मात्र कॅम्प पोलिस घटनास्थळापर्यंत येऊन परिसर आपल्या हद्दीत येत नसल्याचे सांगून माघारी निघून गेले. त्यानंतर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

दरम्यान पोलिसांच्या जबाबदारी झटकण्याचा वृत्तीमुळे आज दुपारी 1:30 वाजेपर्यंत मृतदेह फासावरून खाली उतरवण्यात आला नव्हता. परिणामी तो तसाच झाडावर लटकत असल्यामुळे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत होती.

मयत संजयच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्यामुळे हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत आहे.प्रेम प्रकरणात ही आत्महत्या आहे की खून या बाबत तर्क वितर्क व्यक्त होत आहेत.याप्रकरणी मयताच्या कुटुंबीयांनी पोलिसात फिर्याद दिल्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.