Thursday, December 19, 2024

/

बेळगावच्या ‘या’ जलतरणपटूचे राष्ट्रीय स्पर्धेत सुयश

 belgaum

स्विमर्स क्लब बेळगावच्या अद्वैत दळवी आणि वेदांत मिसाळे या दोन उदयोन्मुख जलतरणपटूंनी बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय पातळीवरील 37 व्या उपकनिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

सदर राष्ट्रीय स्पर्धेच्या 10 वर्षाखालील मुलांच्या पाचव्या गटात अद्वैत दळवी याने 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात तृतीय क्रमांक मिळवताना कर्नाटकला कांस्य पदक मिळवून दिले. वेदांत मिसाळे यांने देखील स्पर्धेच्या पाचव्या गटातील 100 मीटर बटरफ्लाय स्ट्रोक प्रकारात पाचवा क्रमांक मिळवला.

बेंगलोरच्या बसवणगुडी ॲक्वेटिक सेंटर येथे गेल्या 19 ते 23 ऑक्टोबर दरम्यान पार पडलेल्या या उपकनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील सुमारे 1500 जलतरणपटुंनी भाग घेतला होता.Swimming comp.

अद्वैत दळवी आणि वेदांत मिसाळे हे दोघेही केएलईएस सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात पोहण्याचा सराव करतात.

त्यांना उमेश कलघटगी प्रसाद तेंडुलकर यांचे मार्गदर्शन तसेच नितीश कडुचकर, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके आणि गोवर्धन काकतकर यांचे प्रशिक्षण लाभत आहे. त्याचप्रमाणे डाॅ. प्रभाकर कोरे, डाॅ. विवेक सावजी, रो. अविनाश पोतदार व सुधीर कुसाण यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.