कर्नाटक राज्य परिवहन मंडळ हे देशात सर्वाधिक वाहन संख्या असलेलं परिवहन महा मंडळ आहे त्यातच दक्षिण आणि उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्या बहुतांशी बेळगाव वरूनच जातात प्रति मिनिटं 90 ते 120 गाड्या बेळगाव बस स्थानकात आवक जावक करतात.
इतकं व्यस्त असणारे बस स्थानक बंगळुरू नंतर बेळगावचं आहे अश्या परिस्थिती स्मार्ट सिटी योजने अंतर्गत सर्व सोयीनियुक्त बस स्थानक करण्याचा घाट घालण्यात आला परंतु उर्म गतीने चाललेले गेले तीन वर्षाचे प्रवाश्यांची सत्व परीक्षा घेत आहे.
प्रचंड मोठे खड्डे पसरलेली खडी रस्त्याचा उंच सखलपणा आणि खड्ड्यात साचलेलं पाणी प्रवाश्यांना नरक यातना भोगायला भाग पाडतात या पाश्वभूमीवर या खड्ड्यातील तांबडे पाणी चहाच्या किटलीत भरून कपात ओतत अधिकाऱ्यांना देण्याचा प्रयत्न करत एक अभिनव आंदोलन करण्यात आले.
बस स्थानकावरील प्रवाशांत सोशल मीडियावर या आंदोलनाची जोरदार चर्चा होताना दिसत होती.या आंदोलनातून धडा घेऊन संबंधित लवकरच यातून मार्ग काढतील अशी आशा जनता व्यक्त करत आहे.
बेलगाम सोशल नेटवर्क बी एस एन संस्थेकडून गेल्या काही दिवसांपूर्वी देखील बस स्थानकावरील खड्ड्यात कागदी बोटी सोडून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता या आंदोलनाची दखल सोशल मीडिया आणि माध्यमांनी घेतली होती मात्र सुसतावलेले आपली अजगरी चाल सोडण्यास तयार नाही.
उत्तरचे अनिल बेनके यांनी कॅन्टोमेंट हद्दीतील रेल्वे स्थानकासमोरील हाय टेक बस स्टॅण्ड केवळ 11 महिन्यात काम पूर्ण करून घेतले मात्र या कामाची गती मात्र हळुवारपणे चालू आहे.