भारतीय शरीरसौष्ठव महासंघाशी (आयबीबीएफ) संलग्न असलेल्या कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने शिमोगा येथे नुकत्याच पार पडलेल्या युवा दसरा श्री -2021 या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेतील ‘युवा दसरा श्री -2021’ हा मानाचा किताब बेंगलोरच्या सर्वनन हरिराम याने पटकाविला, तर स्पर्धेतील ‘बेस्ट पोझर’ हा किताब बेळगावच्या उमेश गंगणे याने हस्तगत केला.
शिमोगा महानगरपालिका आणि शिमोगा जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कुवेंपू रंगमंदिर येथे उपरोक्त राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बेळगावच्या उमेश गंगणे याच्यासह तानाजी चौगुले, गजानन काकतीकर, प्रताप कालकुंद्रीकर, बसवाणी गुरव, दिनेश नाईक, ओमकार गोडसे, आकाश निंगरानी व बिट्टू झंगरुचे या शरीरसौष्ठवपटूनी उल्लेखनीय यश मिळवले.
स्पर्धेनंतर आयोजित बक्षीस समारंभात स्पर्धेचे पंच आणि अधिकारी असलेल्या रघुनाथन, एम. गंगाधर, सुनिल पवार, सुरेश कुमार, रवी गौडा, अजित व्ही. सिद्दणावर, दिलीप कुमार, निळकंठा, राघू, किशोर, सुनील राऊत, हिरेमठ, मुदलियार, योगेश, सुनिल पवार आणि अनंत लंगरकांडे यांचा शिमोगाच्या महापौर सुनिता अण्णाप्पा यांच्या हस्ते खास सत्कार करण्यात आला. युवा दसरा श्री -2021 राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील गटवार पहिल्या पाच क्रमांकाचे विजेते खालील प्रमाणे आहेत.
55 किलो वजनी गट : आकाश निगरानी (बेळगाव), मोहम्मद सफिर (शिमोगा), बिट्टू झंगरुचे (बेळगाव), नितिष कुमार (चिकमंगळूर), दस्तगीर (शिमोगा). 60 किलो गट : उमेश गंगणे (बेळगाव), दिनेश नाईक (बेळगाव), अविनाश मंटूर (धारवाड), मिलन कांबळे (धारवाड), सलमान खान (एसएमजी). 65 किलो गट : प्रताप कालकुंद्रिकर (बेळगाव), सोमशेखर करवी (उडपी),ओ
मदन कटीजीनबर (धारवाड), रघुनंदन (बेंगलोर), ओमकार गोडसे (बेळगाव). 70 किलो गट : सर्वनन हरीराम (बेंगलोर), तानाजी चौगुले (बेळगाव), बसवानी गुरव (बेळगाव), मल्लिकार्जुन अंबीगेर (बेंगलोर), अभिषेक पुजारी (एमएनजी). 75 किलो गट : मेहबूब बाशा (बेळ्ळारी), निखिल आर. (एसएमजी),
साहिल (एमएनजी) आकाश जाधव (विजापूर), राहुल नागपूर (धारवाड). 80 किलो गट : गजानन काकतीकर (बेळगाव) जाहर (उडपी), मोहम्मद राहील (एसएमजी) आकाश एस. कुमार (उडपी), शैलेश कुमार (एमएनजी). 80 किलो वरील वजनी गट : नित्यानंद कोटयान (उडपी), पवनकुमार एम. एम. (एसएमजी) आनंद एच. एम. (धारवाड). दर्शन एम. (एसएमजी).