ध्वनी प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे.अनेक प्रकारच्या आवाजाने माणसाच्या श्रवण शक्तीवर दुष्परिणाम होत आहेत त्या पाश्वभूमीवर बेळगावच्या रहदारी पोलिसांनी कडक पाऊले उचलायला सुरुवात केली आहे.
तरुणाई मध्ये दुचाकींचे सायलेन्सर काढून मोठा आवाज काढत भरधाव वेगाने चालवण्याची धूम स्टाईल आली आहे.ही पद्धत लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व वाहन अपघाताच्या दृष्टीने हानिकारक आहे.
या बाबी लक्षात घेता रहदारी पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे.आजकाल विना आवाजाच्या आणि विना प्रदूषणाच्या गाड्या मार्केट मध्ये आल्या असल्या तरी बुलेट यामा या सारख्या दुचाकींचे सायलेन्सर काढले तर प्रचंड आवाज होतो या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने वृद्ध रुग्ण आणि विद्यार्थी यांना त्रास सोसावा लागतो त्याकडे दुर्लक्ष करत शायनिंग करणाऱ्या रोड रोमिओना आता चांगलाच चाप बसणार आहे.
पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत असून समाधान देखील व्यक्त करण्यात येत आहे.सोमवारी रहदारी पोलिसांनी आर टी ओ सर्कल जवळ विशेष मोहीम राबवत मोठं सायलेन्सर बसवलेल्या 12 दुचाकीवर कारवाई करत दंड वसूल केला आहे.
भविष्यात देखील अशी कृत्य बंद झाल्यास कारवाई सुरूच राहील असा इशारा रहदारी डी सी पी पुष्पा यांनी दिलाय.