आगामी काळात महाराष्ट्र एकीकरण समिती बळकट करण्यासाठी शहर समितीची पुनर्रचना करण्याची गरज आहे असे मत कोरे गल्ली शहापूरचे जेष्ठ पंच शिवाजी हावळणाचे यांनी व्यक्त केले.
1 नोव्हेंबर काळा दिन कडकडीत पाळून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शहापूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रामलिंग वाडी मंदिर येथे शनिवार 16 ऑक्टोबर 2021 ला पार पडली.
या बैठकीमध्ये युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते सागर पाटील शिवाजी हावळणाचे शिवाजी मजुकर सुनील बोकडे राजकुमार बोकडे रंजीत हावळणाचे अभिजीत मजुकर प्रभाकर पाटील उमेश भातखंडे नारायण काकतकर रोहित वायचळ मनोहर शहापूरकर संदेश मजुकर दिलीप तुळसकर सदानंद बिर्जे कोरे गल्ली शहापूर चे पंच मंडळी गजानन शहापूरकर व इतर समिती नष्ट कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुक मध्ये समितीच्या उमेदवारांचा पराभवाची कारणे येत्या काळामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने निवडणूक लढवताना कोणत्या पद्धतीने वार्ड मध्ये असो किंवा मतदारसंघांमध्ये असो एकाला एक उमेदवार देऊन कसे विजयी झाले पाहिजेत यावर चर्चा केली.
सुनील बोकडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना समितीच्या माध्यमातून येत्या काळामध्ये समाज कार्यामध्ये अग्रेसर राहण्याचा सूचना करत स्वच्छता मोहीम असो व अंतिम विधी साठी लागणारे कार्य असो नेहमी कार्यतत्पर असायला हवे असे सांगितले.