बेळगाव जिल्ह्यातील खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सबरजिस्ट्रार ची 2 कार्यालये सुरू करण्यात आली .मात्र या ठिकाणी सर्व्हर डाऊन चा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. कोणतेही व्यवहार सर्व्हर डाऊन चे कारण सांगून पुढे ढकलण्याचा कारभार सबरजिस्ट्रार खात्यात सुरू झाला असून त्याला वाली कोण? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. एकीकडे फोरजी आणि फाय जी नेटवर्कचे फायबर कंनेक्शन सर्वत्र दिले जात आहे.
इंटरनेटचा जमाना सुरू आहे. अशा काळात सर्व्हर कसे आणि कोणत्या पद्धतीने डाऊन होते? सरकार नेमके कोणत्या कंपनीचे इंटरनेट वापरते आणि सर्वसामान्य नागरिकांचे या यंत्रणेला काही पडले नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.
वेग वेगळ्या खेडेगावातून खरेदी-विक्री व्यवहार तसेच इतर अनेक कामांसाठी नागरिक सबरजिस्ट्रार कार्यालयाकडे दाखल होत असतात. एकदा दाखल झाल्यानंतर सर्व व्यवहार पूर्ण करूनच आपल्या गावाला जाण्याची त्याची इच्छा असते आणि कोविड सारख्या कारणांमुळे सध्या वाहतुकीची माध्यमे कमी झाली आहेत. अशा परिस्थितीत हेलपाटे मारण्याच्या पलीकडे या व्यक्तींकडे कोणताही मार्ग शिल्लक राहत नाही. असे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे .
वयस्कर मंडळी ,महिला अशा व्यक्तींना पुन्हा पुन्हा यावे लागते, हा आंधळा कारभार दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा महसूल विभागाने तसेच कर्नाटक राज्य महसूल विभागाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. सब रजिस्ट्रार कार्यालयाकडे येणाऱ्या व्यक्तींची ससेहोलपट होऊ नये, त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत.
यादृष्टीने लवकरात लवकर योग्य ती व्यवस्था करण्यात यावी. अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे. सबरजिस्ट्रार कार्यालयाला योग्य ती इंटरनेट ची व्यवस्था द्यावी .त्यांचा वारंवार डाऊन होणारा सर्व्हर दुरुस्त करावा .अशी मागणी सध्या होत आहे.