गेल्या वर्षभरापासून स्थानिक भाजप आमदार बुडाला सहकार्य करत नसल्यामुळे बुडाच्या बैठका झालेल्या नाहीत.बुडा अध्यक्षांना देखील त्यांचे सहकार्य नाही.परिणामी अनेक विषय तुंबून राहिले असून बुडाशी असहकार करण्याचे कारण शहरातील दोन्ही भाजप आमदारांनी स्वतःच देणे उचित ठरणार आहे, असे मत केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
शहराच्या दोन्ही आमदारांसह अन्य कांही सदस्य गैरहजर राहिल्यामुळे कोरम अभावी बेळगाव शहर विकास प्राधिकरण अर्थात बुडाची अर्थसंकल्पीय बैठक काल तिसऱ्यांदा रद्द करावी लागली. या पार्श्वभूमीवर आज शहरात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार जारकीहोळी यांनी उपरोक्त मत व्यक्त केले.
गेल्या वर्षभरापासून बुडाच्या बैठका झालेला नाही त्यामुळे स्वच्छता येणे लेआउट वगैरे अनेक विषय तुंबून राहिले आहेत. तीन वेळा रद्द झालेली अर्थसंकल्पीय बैठक आता पुन्हा येत्या 25 तारखेला बोलावण्यात आली आहे त्यावेळी तरी उभय आमदार येतात का ते पाहूया? असे आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले.
गेल्या वर्षभरापासून भाजप आमदार विकासाच्या बाबतीत बुडाला सहकार्य करत नाहीत. याचे स्पष्टीकरण त्यांनीच द्यावयास हवे दोन्ही आमदारांनी बैठकीला न येण्याचे कारण स्पष्ट करावे. त्याचप्रमाणे लोकनियुक्त सदस्य आणि अधिकाऱ्यांनाही ते बैठकीस जाऊ देत नाहीत.
हे सर्व ते कशासाठी करत आहेत याचे उत्तर त्यांनीच द्यावे, असे सांगून बेळगाव महापौरपदाच्या या निवडीबद्दल बोलताना बेळगावचा महापौर नियुक्त करण्यासाठी संबंधितांना माझ्या मते अजून किमान एक वर्षाचा कालावधी लागेल, असे मिश्किल उत्तर त्यांनी दिले. बेळगावची सिस्टीमच कशी आहे, असे आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले.