बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील आणि विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात वारंवार कलगीतुरा सुरू आहे.
संजय पाटील यांनी मराठा समाजाचा अपमान केल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मराठीत एक व्हिडिओ निवेदन प्रसिद्ध केले आहे.यात थेट त्यांनी लक्ष्मी हेब्बाळकर यांची तुलना पेशवेकालीन आनंदीबाईशी केली आहे.
सोशल नेटवर्किंग आणि मीडियावर माझ्याबद्दल काहीतरी चूकीचे पसरवले जात आहे. या संजय पाटील चा जन्म कोल्हापुरात झाला.जेव्हा मी आमदार होतो, मी राजहंसगडामध्ये शिवाजी स्मारक उभारले आहे , कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज जयंती सुरू करण्याचा प्रयत्न केला , असे असताना मी मराठी विरोधी कसा? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
मराठी माणसाला पेशव्याचा इतिहास माहीत आहे. त्याच प्रकारे एक आनंदीबाई ध चा मा करून माझ्याबद्दल गोंधळ निर्माण करत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.