माजी आमदार संजय पाटील मराठी माणसांवर पुन्हा एकदा घसरले आहेत. बेळगाव ग्रामीण च्या विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि त्यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.या वादात संजय पाटील यांनी मराठी माणसांवर तोंडसुख घेतल्याने संताप वाढला आहे.
राकस्कोप क्रॉस नजिक पडलेल्या खड्ड्या संदर्भात एक बॅनर लावण्यात आला. त्या बॅनर मध्ये लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर टीका करण्यात आली होती .बॅनर लागल्यानंतर लगेच बेळगाव ग्रामीण भाजपतर्फे ते खड्डे बुजवण्यात आले .
या संदर्भात माध्यमानी छेडले असता तो बॅनर मात्र आपण लावला नसल्याचे आमदार संजय पाटील यांनी म्हटले आहे. ते एवढे बोलून थांबले नाहीत तर असले घाणेरडे प्रकार भाजप कधीच करत नाही. रात्रीच्या वेळी बॅनर लावायची कामे मराठी माणसे करतात .
असे उत्तर त्यांनी माध्यमांना दिल्यामुळे मराठी भाषिकात संताप वाढला आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघात दोनवेळा आमदार होण्याचा मान मिळवलेल्या संजय पाटील यांना मराठी मताने साथ दिली आणि आमदारकी हातातून जातानाही मराठी मतेच कमी पडली
. त्यामुळे बहुधा माजी आमदार संजय पाटील रागावले असतील की काय आणि त्यांनी मराठी माणसावर असा आपला राग काढण्याचा प्रयत्न केला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र अशा प्रकारे मराठी माणसांवर तोंडसुख घेतल्यास येत्या निवडणुकीतही त्यांचे स्वतःचे आणि भाजपचे पुन्हा एकदा मोठे नुकसान होणार हे मात्र नक्की आहे.