मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे 75 व्या इन्फंट्री डे सोहळ्याचे औचित्य साधून उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष कोरोना वाॅरियर साजिद शेख यांचा सत्कार करण्यात आला.
मराठा लाईट इन्फंट्री सेंटरच्या (एमएलआयआरसी) शर्कत वॉर मेमोरियल येथे काल बुधवारी ’75 वा इन्फंट्री डे’ साजरा करण्यात आला. काश्मीर येथे भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला चोख प्रत्युत्तर देऊन शौर्याचे एक नवे रूप देशाला दाखवून दिले.
याची आठवण म्हणून 27 ऑक्टोबर रोजी इन्फंट्री डे साजरा साजरा केला जातो. या सोहळ्याचे औचित्य साधून कोरोना वॉरियर साजिद शेख यांचा एमएलआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडियर रोहित चौधरी यांच्या हस्ते एमएलआयआरसीचे स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते साजिद शेख यांच्या प्रमाणे कोरोना प्रादुर्भाव काळात राष्ट्र प्रथम या भावनेतून उत्कृष्ट कार्य केलेल्या डॉक्टर, परिचारिका, महिला पोलीस कर्मचारी,
स्वच्छता कर्मचारी आदींचाही यावेळी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सदर समारंभास निमंत्रितांसह मराठा सेंटरचे अधिकारी आणि जवान उपस्थित होते.