विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर नवी गल्ली शहापूर येथील वायुपुत्र सेना मंडळातर्फे गल्लीतील स्थळ देवस्थाना मंदिरामागील 30 फूट उत्तुंग ध्वजस्तंभावर भव्य भगवा ध्वज फडकविण्याचा समारंभ आज सकाळी उत्साहात पार पडला.
नवी गल्ली शहापूर येथील वायुपुत्र सेना मंडळातर्फे गल्लीतील स्थळ देवस्थान मंदिरामागे 30 फूट उंचीचा ध्वज स्तंभ उभारण्यात आला आहे.
सदर स्तंभावर भगवा ध्वज फडकवण्याचा समारंभ आज सकाळी आयोजित करण्यात आला होता. सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून प्रभागाचे नवनिर्वाचित नगरसेवक रवी महादेव साळुंखे उपस्थित होते.
यांच्या हस्ते विधिवत पूजन करून भगवा ध्वज फडकविण्यात आला. याप्रसंगी सरपंच दशरथराव शिंदे, अमृतराव भाकोजी, संजय भाकोजी, सुरेश शिंदे, वायुपुत्र सेना मंडळाचे अध्यक्ष तानाजी शिंदे, उपाध्यक्ष गजानन सुतार, विशाल शिंदे, चेतन भाकोजी, रोशन शिंदे, शुभम भाकोजी, बबन सुतार, रोहित भाकोजी आदींसह मंडळाचे अन्य कार्यकर्ते आणि गल्लीतील नागरिक उपस्थित होते.
वायुपुत्र सेना मंडळाचा शहापूर भागातील हा भव्य भगवा ध्वज सध्या सार्यांचे लक्ष वेधून घेत आहे.