रोटरी परिवार बेळगाव, साधू वासवानी मिशन पुणे आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने
बेळगावात येत्या रविवार दि. 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 8:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
अयोध्यानगर टिळकवाडी येथील विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटर येथे हे शिबिर होणार आहे. सदर शिबिराच्या आयोजनासाठी शहरातील रोटरी क्लब ऑफ बेळगाव, रोटरी क्लब ऑफ बेळगाव साउथ, रोटरी मिड टाउन, रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थ, रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल,
रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण, रेड क्रॉस सोसायटी, जिल्हा अपंग कार्यालय आदींनी पुढाकार घेतला आहे. तरी या मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण शिबिराचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.