पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून कोल्हापूर सर्कल येथून टिळकवाडीच्या दिशेने येणारी दुचाकी दुभाजकावर धडकल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना गुरुवारी पहाटे घडली आहे. या घटनेमुळे टिळकवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे.
पूजा महेश गावडे ( रा. आगरकर रोड, वय 45 ) असे या मृत महिलेचे नाव आहे तर तिच्या बरोबर असणारी तिची मुलगी तन्वी महेश गावडे (वय 18 ) ही गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे .
बाहेरगावाहून आल्यानंतर कोल्हापूर सर्कल येथे लावून ठेवलेली दुचाकी टिळकवाडी येथे घराकडे घेऊन जात असताना हा अपघात घडला असून यामुळे मोठी हानी झाली आहे. या प्रकरणी रहदारी दक्षिण पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.