Sunday, December 22, 2024

/

महिलेचे प्रसंगावधान अन् घुबडाला जीवदान

 belgaum

चिदंबरनगर येथे रस्त्यावर पडलेल्या एका असहाय्य जखमी घुबडाला पक्षीप्रेमी महिलेच्या प्रसंगावधानामुळे आज सकाळी जीवदान मिळाले.

याबाबतची माहिती अशी की, आज सकाळी फिरावयास निघालेल्या मृदुला साखळकर यांना चिदंबरनगर 8वा क्रॉस टिळकवाडी येथे रस्त्यावर एक घुबड पक्षी जखमी अवस्थेत पडलेला आढळून आला.

रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे असहाय्य जखमी अवस्थेत पडलेल्या त्या घुबडाचे कांही बरेवाईट होऊ नये यासाठी पक्षीप्रेमी मृदुला यांनी प्रसंगावधान राखून त्या घुबडावर एक बॉक्स झाकून ठेवला.

त्यानंतर सदरची माहिती त्यांनी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांना दिली. तेंव्हा संतोष दरेकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंखाला दुखापत झालेल्या त्या जखमी घुबडाला ताब्यात घेऊन प्रथम त्याच्यावर प्रथम उपचार केले. त्यानंतर ते घुबड अधिक उपचारांती नैसर्गिक अधिवासाचे सोडून देण्यासाठी कर्नाटक राज्य अरण्य खात्याचे मोहम्मद किल्लेदार यांच्याकडे सुपूर्द केले.

त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना एखादा पशुपक्षी असहाय्य जखमी अवस्थेत आढळून आल्यास कृपया त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये. संबंधित पशुपक्षासाठी मदत कार्य हाती घ्यावे अथवा आपल्याशी (मो. क्र. 9986809825) संपर्क साधावा, असे आवाहन संतोष दरेकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.