आता नगरसेवक आणि अधिकारी यांच्या समन्वयातून होणार शहराचा विकास करणार त्यासाठीच मनपा सभागृहात उत्तर मतदारसंघातील नगरसेवकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत अशी माहिती आमदार बेनके यांनी दिली.
महानगरपालिकेमध्ये उत्तर विभागातील नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार अनिल बेनके उपस्थित होते. यावेळी उत्तर विभागातील 33 नगरसेवकांचा महापालिकेवर निवडून आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांना आपापल्या प्रभागातील समस्या लेखी देण्याच्या सूचना आमदारांनी केल्या.
यावेळी आमदारांनी येणाऱ्या चार दिवसात प्रत्येक वॉर्डत जाऊन अधिकारी आणि नगरसेवकांची भेट घडवून आणून त्यांच्या समन्वयातून वॉर्डातील विकास मार्गी लावण्याचा सूचना केल्या. प्रत्येक नगरसेवकाने आपल्या वॉर्डातील अधिकाऱ्याला योग्य उपाय योजना राबवून वॉर्डातील समस्या दूर करण्याच्या सूचना या बैठकीत केल्या . कोणताही जात धर्म भेद पंथ विसरून शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे. अशा सूचना प्रसार माध्यमाद्वारे नागरिकांना केल्या.
शहरातील समस्या दूर करण्यासाठी आजची बैठक महापालिकेत आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक वॉर्डातील सॅनिटाईझेशन अधिकारी, हेस्कॉम , पाणीपुरवठा मंडळ , एल अँड टी कंपनी, महानगरपालिकेचे अधिकारी आणि नगरसेवकांच्या गाठीभेटी करून शहराचा विकास जलद गतीने होण्याकरिता पावले उचलली जातील असे आमदारांनी या बैठकीत स्पष्ट केले.