गेल्या कित्येक महिन्यापासून महाराष्ट्र आणि गोव्यातून बेळगाव जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाला आर टी पी सी आर(कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र) ची गरज होती मात्र आता ही अट शिथिल करण्यात आली आहे त्यामुळे गोवा आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाश्यांना दिलासा मिळाला आहे.
बेळगावचे जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी आर टी पी सी आर(कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र) अट शिथिल करण्याचा आदेश बजावला आहे.
बेळगाव हा सीमावर्तीय जिल्हा आहे गोवा आणि कर्नाटकाच्या सीमेवर अनेक रस्त्यावर बॅरिकेडस लावण्यात आले होते बेळगावात येणाऱ्या कडून आर टी पी सी आर ची तपासणी केली जात होती या आदेशानंतर आता हे बरीकेड्स हटवले जाणार आहेत.
रस्त्यासह रेल्वे स्थानक आणि विमानतळावर देखील याची अंमलबजावणी होणार आहे. नवरात्रीत बेळगावहुन महाराष्ट्रात आणो महाराष्ट्रातून कर्नाटकात ये जा करणाऱ्यांची संख्या हजारोंनी असते यासाठी सदर आर टी पी सी आर ची अट शिथिल व्हावी अशी मागणी केली जात होती त्यानुसार जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी हा आदेश बजावला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी हिरेमठ यांना सीमेवर तपासणी बंद करा अशी विनंती केली होती त्यावर डी सी यांनी आश्वासन दिले होते त्यानुसार आता बेळगावात येताना कोविड निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक असणार नाही.