कोणत्याही कारणास्तव, काळा दिवस साजरा करण्याची परवानगी नाही. असे आवाहन करत जिल्हाधिकारी महंतेश हिरेमठ यांनी कन्नड संघटनांना 1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सव शांततेने कोविड नियमावली पाळून साजरा करण्याचे आवाहन केले.
कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर 1 नोव्हेंबर रोजी डीसी कार्यालयाच्या सभागृहात कन्नड संघटनांसह प्राथमिक बैठक बोलावण्यात आली होती. दिवंगत कन्नड सेनानी रामचंद्र औवली, कल्याणराव मुचलंबी, पुष्पा हुब्बली आणि इतरांबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. कर्नाटक संघटनांच्या कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक चंद्रगी, म्हणाले की, कर्नाटक राज्योत्सव गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे. संपूर्ण शहर सुंदर सुशोभित केले पाहिजे. देखवयांना परवानगी द्यावी. सर्व प्रतिनिधींनी कार्यक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे.
बेळगाव शहराच्या सर्व मंडळांमध्ये कन्नड झेंडे आणि पिवळ्या-लाल रंगाचे साहित्य ठेवावे. कर्नाटक राज्योत्सव सीमेवरील सर्व मराठी शाळांमध्ये साजरा केला पाहिजे. त्याचप्रमाणे, एमईएसला काळा दिवस साजरा करण्याची परवानगी देऊ नये. केवळ एक दिवसाचा कन्नड कार्यक्रम नाही तर वर्षातील 365 दिवस हा कार्यक्रम करूया असेही ते म्हणाले. मिरवणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने ने सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. पोलिसांनी मिरवणुकीत अडथळा आणू नये. कोविड लसीकरणावर अधिक काम करण्याची सूचना केली.
यावेळी बोलताना श्रीनिवास टाळूकर म्हणाले की, गणेशोत्सव काळात एम ई एस ला चन्नम्माच्या कन्या लक्ष्मी निप्पाणीकरच्या रूपाने धाडसी उत्तर दिले होते. अशा अधिकाऱ्यांचा आदर करत त्यांनी बेळगावातील कन्नड वाचवण्याचे काम केले आहे. जिल्हा अधिकाऱ्यांनी याचे अनुकरण करावे अशी मागणी केली.
पोलीस आयुक्त डॉ त्यागराजन यांनी राज्योत्सव परेड शांततेत होण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
कन्नड भाषेच्या अंमलबजावणीवर भर देत दीपक गुडगनट्टी यांनी जिल्हा अधिकाऱ्यांनी यासंदर्भात योग्य ती कारवाई करावी, असे आवाहन केले.
अनंत ब्याकुड यांच्याबद्दल बोलताना, कन्नड राज्योत्सव पुरस्कारांचे मुख्य भाषण बेळगावच्या सुवर्ण मंदिरात झाले पाहिजे. बेळगाव कन्नड राज्योत्सवासाठी सरकारने विशेष अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.