भातकांडे गल्ली येथील संजय बेळगावकर यांची बुडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 10 जानेवारी 2020 रोजी अध्यक्ष म्हणून निवड झालेल्या गुळाप्पा बी होसमनी यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
भाजप आमदार, नामनिर्देशित सदस्य आणि सरकारी प्रतिनिधी यांच्या अनुपस्थितीमुळे कोरम अभावी बुडाच्या शेवटच्या दोन बैठका अनिश्चित काळासाठी रद्द होऊन पुढे होत्या.
कणबर्गी मधील स्कीम क्रमांक 61, आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम, उद्याने, क्रीडांगणे आणि रस्ते यांचा विकास असे अनेक विकास प्रकल्प प्रलंबित आहेत.
बेळगाव शहरात आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम बांधणे आणि कणबर्गी योजनेसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांसह विविध विकास कामांच्या अंमलबजावणीसाठी 22 ऑक्टोबरला मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर बुडा अध्यक्षपद बदलण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
बुडा मध्ये नियमित बैठका होत नसल्याने नाराजी होती त्यातच नवीन अध्यक्ष बुडाला मिळाला आहे. बेळगावकर यांच्या सोबत एम बी जिरली, मुरगेंद्र पाटील यांच्या सह अनेक जणांनी नावे चर्चेत होती. लिंगायत समाजातील नेत्याला हे पद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त जात होती.अखेर भाजपचा जुना चेहरा असलेले यापूर्वी महानगर अध्यक्ष पद भूषविलेले संजय बेळगावकर यांच्या गळ्यात बुडा अध्यक्ष पदाची माळ पडली आहे.