मराठा साम्राज्याचा दैदिप्यमान इतिहास सर्वांसाठी खुला व्हावा यासाठी बेळगावातील एक मराठी उद्योजक पुढे आले आहेत. त्यांनी भारत इतिहास संशोधन मंडळाला तब्बल एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. यातील 35 लाख रुपयांच्या प्रकल्पाचे काम सुरूही झाले आहे .
भारत इतिहास संशोधन मंडळातील दहा लाखांपेक्षा अधिक कागदपत्रांचे डिजिटायझेशन होणार आहे आणि ही कागदपत्रे संकेतस्थळावरून सर्वांसाठी खुली केली जाणार आहेत. त्यांचे लिप्यंतर होऊन सामान्य वाचकांनाही उपलब्ध होतील. दोन वर्षांच्या या प्रकल्पाला बेळगावचे उद्योजक नरेंद्र मुरकुंबी यांच्या देणगीतून विजयादशमी च्या मुहूर्तावर सुरुवात करण्यात आली आहे.
मुरकुंबी कुटुंब हे मराठी आहे .अनेक वर्षांपासून कर्नाटकात स्थायिक आहे. नरेंद्र यांच्या आई विद्याताई मुरकुंबी यांनाही मराठी साम्राज्याच्या इतिहासाची आवड आहे. ही आवड नरेंद्र यांनाही आहे.
1630 ते 1818 या काळातील महाराष्ट्राचा इतिहास झपाटून टाकणारा आहे. त्या संबंधीची असंख्य कागदपत्रे अजूनही अप्रकाशित आहेत.
मंडळात अशी 10 लाखांपेक्षा जास्त कागदपत्रे असल्याचे समजते. जगासमोर हे आणण्याची गरज आहे.आधुनिक तंत्रज्ञानामुळे ते सहज शक्य आहे.त्यातून नवे उद्योजक तयार व्हावेत हे अपेक्षित आहे. असे नरेंद्र मुरकुंबी म्हणाले.
Very nice and revolutionary work
Very unique and spl cause…
Thank you, your efforts will be ever cherished